जागतिक महिला दिन ८ मार्च २०२६
कॉसमॉस फाउंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त आदर्श व कर्तबगार महिलांचा सत्कार – मार्च २०२६ कॉसमॉस फाउंडेशन, पुणे यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील वैद्यकीय, कला, क्रीडा, उद्योग/ व्यवसाय क्षेत्रातील महिला त्याचप्रमाणे कायदे तज्ञ, समाजसेविका व पोलीस दलातील महिला अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार खासदार प्रा. सौ. मेधाताई कुलकर्णी आणि अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त श्रीमती दीपा हिरे तसेच कॉसमॉस फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. श्रीपाद पंचपोर व विश्वस्त डॉ. अशोक जोशी यांचे हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिव्यांग खेळाडूस रक्कम रु. २५०००/- क्रीडा शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली.