मोफत कायदा सल्ला केंद्राच्या उद्घाटन समारंभाची काही क्षणचित्रे

कॉसमॉस फाउंडेशन पुणे ही न्यास संस्था गेली ४० वर्षाहून अधिक काळ पुणे शहर व परिसरामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करीत आहे.संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू नागरिकांना कायदेविषयक बाबींवर योग्य सल्ला मिळण्याच्या उद्देशाने मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू करण्यात येत आहे.
या केंद्राचे उद्घाटन रविवार, ७ जून २०२६ रोजी पटवर्धन बाग येथील जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’ येथे झाले.

या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे वृद्धापकाळात उपलब्ध असलेल्या कायदेशीर संरक्षणाबाबत आणि सर्वसाधारण व्यक्तीस ऑनलाइन माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना कशा पद्धतीने त्यांची फसवणूक केली जाते, ती होऊ नये म्हणून कायदे तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन दिले गेले. याचा जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून फायदा घ्यावा असे आवाहन कॉसमॉस फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. श्रीपाद पंचपोर यांनी केले आहे.
वर्षानुवर्ष कोर्टकचेरीत अडकून राहण्यापेक्षा वरील उपक्रमाच्या माध्यमातून न्यायालयीन निर्णय त्वरित मिळवा व या संधीचा फायदा स्वतः घ्या व इतरांनाही उपक्रमाची माहिती द्या.
अधिक माहितीसाठी कृपया ९४२२०७८९५६ / ९८५९६७००२५ या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.