कॉसमॉस फाउंडेशन आणि निरामय संस्थेतर्फे 'किशोरी शक्ती प्रकल्प' अंतर्गत शैक्षणिक आर्थिक मदत वाटप संपन्न

कॉसमॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम: किशोरी शक्ती प्रकल्पांतर्गत ९ विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत सुपूर्द

कॉसमॉस फाउंडेशन, पुणे या सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे निरामय संस्थेच्या किशोरी शक्ती प्रकल्प अंतर्गत पुणे शहरातील विविध वस्त्यांमधील अल्प उत्पन्न गटातील किशोरवयीन मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम वि.रा. रुईया मूकबधिर विद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळी सदाशिव पेठ, पुणे येथे शनिवार दि.२६.१०.२०२६ रोजी संपन्न झाला.
 उपक्रमांतर्गत एकूण ९ मुलींना रु.२५०००/- इतकी रक्कम शैक्षणिक खर्चासाठी मदत म्हणून देण्यात आली.
 कॉसमॉस फाउंडेशनच्या सचिव अॕड.सौ.अनुराधा अंतापुरकर भारती व विश्वस्त अॕड. सौ. राधिका उर्सेकर तसेच निरामय संस्थेचे विश्वस्त श्री. उमेश भोसले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.